सेल्फी घेण्यासाठी चढला ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये अन् घडलं भलतंच; वाचून व्हाल थक्क

Boarded the 'Vande Bharat' train to take a selfie and bad things happened; You will be surprised to read

‘वंदे भारत’ ( Vande Bharat) या ट्रेनचे लोकांमध्ये आकर्षण आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये ‘वंदे भारत’चे आगमन झाले होते. यामुळे रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली होती. या ट्रेनने भारतीय ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी (Travel Technology) मध्ये नवीन पर्व सुरू केले. देशातील नागरिकांमध्ये या रेल्वेची भयानक क्रेझ आहे. या ट्रेन सोबत सेल्फी व फोटो काढण्यासाठी आजही प्रवासी धडपड करत असतात.

धक्कदायक! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

यामुळे अनेकदा चुकीच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, आंध्रप्रदेश येथील राजमुंद्री स्टेशनवर अशीच घटना घडली आहे. या स्टेशनवर ट्रेन आल्यानंतर त्यामध्ये सेल्फी घेण्यासाठी एक व्यक्ती चढली. मात्र, दुसऱ्याच क्षणी ट्रेनने वेग पकडला आणि अचानक ट्रेनचा ऑटोमॅटिक दरवाजा (Automatic Door) बंद झाला.

ब्रेकिंग! महेश भट्ट यांच्या तब्येतीबाबत महत्वाची अपेडट समोर!

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ट्रेन मध्ये अडकलेला व्यक्ती चालत्या ट्रेन मध्ये गेट उघडण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी तो टीसीला गेट उघडण्याची विनंती करतो. परंतु, टीसी देखील पुढच्या स्टेशनवर उतरायला सांगून त्या व्यक्तीकडून भाडे आकारतो. एका सेल्फी मुळे त्या व्यक्तीची झालेली फजिती पाहून इतर प्रवासी देखील त्याच्यावर हसू लागले.

बृजभूषण सिंह यांनी राजीनामा देण्यास दिला स्पष्टपणे नकार!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *