गरोदरपणातही ऊसाच्या फडात काम करणाऱ्या महिलांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल

The National Human Rights Commission has taken notice of women who work in sugarcane fields even during pregnancy

ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे गाव सोडून दुसऱ्याच्या गावात येऊन दिवसरात्र काबाडकष्ट कष्ट करत असतात. पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत ते राबराबराबत असतात. या ऊसतोड मजुरांसोबत दिवसरात्र त्यांचे कुटुंब देखील कष्ट करत असते. ऊसतोड मजुरांची पत्नी त्याचबरोबर त्यांची लहान मूल देखील दिवसभर राबत असतात. यामध्ये काही महिला गरोदर असताना देखील उसाच्या फडात काम करत असतात.

बृजभूषण सिंह यांनी राजीनामा देण्यास दिला स्पष्टपणे नकार!

आता गरोदर असताना ज्या महिला उसाच्या फडात काम करत आहेत त्या महिलांबाबत थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकारला नोटीस देखील पाठवली आहे. त्याचबरोबर पुढच्या एका महिन्यामध्ये याबाबतचा सविस्तर अहवाल देखील मागवण्यात आला आहे.

ब्रेकिंग! महेश भट्ट यांच्या तब्येतीबाबत महत्वाची अपेडट समोर!

ऊसतोड मजुरी करणाऱ्या महिलांपैकी जवळपास दहा टक्के गर्भवती महिला आहेत, मात्र या महिलांना काही सरकारी योजना आणि त्यांचे कायदेशीर हक्क याबाबत काहीही माहिती नसल्याची माहिती समोर आलं आहे. याचपार्शवभूमीवर सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं नोटीस देखील पाठवली आहे.

सेल्फी घेण्यासाठी चढला ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये अन् घडलं भलतंच; वाचून व्हाल थक्क

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. यामध्ये जवळपास १५२ गरोदर ऊसतोड महिला मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. या गरोदर महिलांचे श्रीगोंदा तहसील अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत सर्व्हेक्षण केले जाते. नंतर त्यानं त्यांच्या मूलभूत हक्क आणि आरोग्याबाबत जागरूक केलं जातं यासाठी आरोग्य सेविकांची देखील मदत घेतली जाते.

धक्कदायक! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *