Madha Loksabha । देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का; जवळच्या विश्वासू नेत्याने दिला शरद पवारांना पाठिंबा

Madha Loksabha

Madha Loksabha । सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहे. यंदाच्या निवडणुकीत माढा मतदारसंघ (Madha Constituency) चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) भाजपला (BJP) सर्वात मोठा धक्का दिला आहे.

Praniti Shinde । प्रणिती शिंदेंची वाढली ताकद, पोटनिवडणुकीत 1 लाख मते मिळालेल्या नेत्याने दिला पाठिंबा

माढा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात आता धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांच्यात लढत पार पडेल. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होईल? हे येत्या काळात स्पष्ट होईल. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला होता.

Lok Sabha । सर्वात मोठी बातमी! अखेर महायुतीत जागांचा तिढा सुटला; या नेत्यांना मिळाली उमेदवारी

त्यासाठी त्यांना नागपूरला बोलावण्यासाठी खाजगी विमान देखील पाठवले होते. पण आता फडणवीसांना चांगलाच धक्का बसला आहे. उत्तम जानकर हे आता रणजित नाईक निंबाळकर नाही तर धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करणार आहेत. जानकर 19 तारखेला मेळावा घेऊन आपला निर्णय घोषितकरणार आहेत. याचा फडणवीसांना फटका बसला आहे.

Bjp । ब्रेकिंग! अखेर भाजपकडून उमेदवारांची १३ वी यादी जाहीर

Spread the love