Praniti Shinde । प्रणिती शिंदेंची वाढली ताकद, पोटनिवडणुकीत 1 लाख मते मिळालेल्या नेत्याने दिला पाठिंबा

Praniti Shinde

Praniti Shinde । सध्या राज्यात निवडणुकीचे (Loksabha election) वारे वाहत आहे. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहे. काही मतदारसंघ हे यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातील एक मतदारसंघ म्हणजे सोलापूर मतदारसंघ (Solapur Constituency) होय.

Lok Sabha । सर्वात मोठी बातमी! अखेर महायुतीत जागांचा तिढा सुटला; या नेत्यांना मिळाली उमेदवारी

या मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते (Praniti Shinde Vs Ram Satpute) असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. आज प्रणिती शिंदे या अर्ज दाखल करणार असून त्यापूर्वी दिलासा मिळाला आहे. प्रणिती शिंदे यांना भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि भालके गटाच्या समर्थकांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेंची ताकद वाढली आहे.

Bjp । ब्रेकिंग! अखेर भाजपकडून उमेदवारांची १३ वी यादी जाहीर

दरम्यान, भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत माजी आमदार भरत भालके यांचे पुत्र आहे. भरत भालके यांच्या निधनानंतर पक्षाने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीचे तिकिट दिले होते. पण त्यात त्यांना पराभव सहन करावा लागला. पोट निवडणुकीत भालके यांना 1 लाख मते मिळाली होती. महाविकास आघाडीला याचा फायदा होईल.

Pune News । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात घडलं भयानक; घटना वाचून बसेल धक्का

Spread the love