Bjp । ब्रेकिंग! अखेर भाजपकडून उमेदवारांची १३ वी यादी जाहीर

BJP

Bjp । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने १३ वी यादी जाहीर केली आहे. यामध्ये रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदार संघात आता नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Pune News । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात घडलं भयानक; घटना वाचून बसेल धक्का

मागच्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून तिढा होता. मात्र अखेर हा तिढा सुटला आहे. गुरुवारी भाजपने यादी जाहीर केली असून आता नारायण राणे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Pune Crime | पुणे हादरलं! तीन दिवसांत तीन गोळीबाराच्या धक्कादायक घटना

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गट आग्रही होता. या जागेसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छुक होते. मात्र, आज नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आज उदय सामंत यांनी भाजपकडून नारायण राणेंना उमदेवारी जाहीर झाल्यास काम करू, असे स्पष्ट केले. त्यामुळे ते नाराज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis । उपमखुमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबाबत केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Spread the love