Lok Sabha । सर्वात मोठी बातमी! अखेर महायुतीत जागांचा तिढा सुटला; या नेत्यांना मिळाली उमेदवारी

Lok Sabha

Lok Sabha । महायुती महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असला तरी काही जागांचा तिढा कायम आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील काही नाराज नेते पक्षाने तिकीट नाकारल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीमध्ये काही जागांचा तिढा अखेर सुटला आहे. (Latest marathi news)

Bjp । ब्रेकिंग! अखेर भाजपकडून उमेदवारांची १३ वी यादी जाहीर

महायुतीत ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जागांवरून तिढा कायम होता. अखेर हा तिढा सुटला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना लॉटरी लागू शकते. महत्त्वाचे म्हणजे या तीनही जागांवरील लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची औपचारिकरित्या घोषणा बाकी आहे.

Pune News । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात घडलं भयानक; घटना वाचून बसेल धक्का

या तीनही जागांवरील उमेदवारांच्या नावाची औपचारिकरित्या घोषणा शिंदेंचे मंत्री दीपक केसरकर करणार असून ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागा शिदेंगटाकडे असणार आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त रस्सीखेच ही नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सुरू आहे. अशातच आता दीपक केसरकर यांच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Pune Crime | पुणे हादरलं! तीन दिवसांत तीन गोळीबाराच्या धक्कादायक घटना

Spread the love