नवी दिल्ली : भाजपाचे (BJP) खासदार ब्रिज भूषण सिंह (Bridge Bhushan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूच्या (Female wrestler) विनयभंगाचे आरोप केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलन करत होते. ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधात दोन महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या विनयभंगाच्या आरोपांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
तरुणी बाईकवर दोन्ही हात सोडून व्हडिओ काढत होती, मात्र काही वेळातच… व्हिडीओ पाहून बसेल धक्का
ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणाऱ्या दोन महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी पुरावे मागितले आहेत. याबाबतची नोटीस पोलिसांनी त्या दोन कुस्तीपटूंना पाठवली आहे. पुरावे म्हणून पोलिसांनी फोटो,ऑडिओ, व्हिडिओ मागितले आहेत.
लेकीचे नको ते फोटो पाहिले वडिलांनी अन् घडले धक्कादायक, घटना वाचून व्हाल थक्क
ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूकडून अनेक विनयभंगाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी संघटनेच्या कार्यालयात श्वास तपासणी करताना विनयभंग केला. तसेच परदेशात पदक जिंकल्यानंतर त्यांनी जबरदस्तीने १० ते १५ सेकंद मिठी मारली. असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. या संदर्भातील चौकशीसाठी पोलिसांनी पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, आमच्याकडे जे काही पुरावे होते. ते सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत, असे कुस्तीपटूंनी सांगितले.
ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधात दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन चालू होते. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना १५ जून पर्यंत ब्रिज भूषन सिंह यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन कुस्तीपटूंना दिले. त्यानंतर कुस्तीपटूंनी १५ जून पर्यंत आंदोलन थांबवले आहे.
खेळ बेतला जीवावर! झोका खेळत असताना गळफास लागून चिमुकलीचा मृत्यू