सध्या लोकांना सोशल मीडियाचे (Social Media) अक्षरशः वेड लागले आहे. याठिकाणी फेमस होण्यासाठी लोक अगदी काहीही करायला तयार होतात. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी स्टंटबाजी करण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहे. अनेकजण गाडी चालवताना वेगेवेगळे स्टंट करून व्हिडीओ करत असतात. सध्या देखील सोशल मीडियावर एका मुलीचा बाईकवर स्टंट करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लेकीचे नको ते फोटो पाहिले वडिलांनी अन् घडले धक्कादायक, घटना वाचून व्हाल थक्क
डेहराडूनच्या रायपूरमध्ये चालत्या बाईकवर रील बनवणे मुलीला चांगलेच महागात पडले आहे. या मुलीचा हा व्हिडिओ पोलिसांपर्यंतही पोहोचला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुलीची दुचाकी ताब्यात घेतली. त्याच झालं असं की, चालत्या बाईकवर दोन्ही हात सोडून मुलगी रील बनवत होती. यानंतर तिने ती रील सोशल मीडियावर पोस्टही केली. आणि रील व्हायरल देखील झाली.
लेकीचे नको ते फोटो पाहिले वडिलांनी अन् घडले धक्कादायक, घटना वाचून व्हाल थक्क
मात्र रीळ व्हायरल होणे तिला चांगलेच महागात पडले आहे. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचताच त्यांनी मुलीची माहिती गोळा केली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात बोलावून दुचाकी ताब्यात घेतली आहे.