अरबी समुद्रातील बिपरजॉय ( Biperjoy in the Arabian Sea ) चक्रीवादळामुळे मान्सूनला वाहण्यासाठी मदत मिळाली आहे. कर्नाटकच्या ( Karnatak ) किनारपट्टीवरील चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असल्यामुळे मान्सूनने प्रगती केली आहे. सोमवारपर्यंत गोवा आणि महाराष्ट्रात ( Goa and maharashtra ) मान्सून पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
तरुणी बाईकवर दोन्ही हात सोडून व्हडिओ काढत होती, मात्र काही वेळातच… व्हिडीओ पाहून बसेल धक्का
गुरुवारी मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली होती. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये देखील मान्सूनचे आगमन सुरू झाले आहे. पश्चिम किनारपट्टीवरून ( west coast ) पुढे सुरु झालेला मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालचा उपसागर या भागामध्ये मान्सून सुरू झालेला आहे. सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनालपर्यंत मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचा हवामान विभागाने स्पष्ट केला आहे.
तरुणी बाईकवर दोन्ही हात सोडून व्हडिओ काढत होती, मात्र काही वेळातच… व्हिडीओ पाहून बसेल धक्का
बिपरजॉय या चक्रीवादळाची तीव्रता कायम राहणार आहे. गोव्यापासून ७०० किलोमीटर वायव्येकडे, मुंबईपासून ६२० किलोमीटर पश्चिमेकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून ६०० किलोमीटरपर्यंत ही प्रणाली शनिवारपर्यंत नैर्ऋत्येकडे होती. ईशान्य दिशेकडे सरकणारी ही प्रणाली आजपासून वायव्येकडे वळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
लेकीचे नको ते फोटो पाहिले वडिलांनी अन् घडले धक्कादायक, घटना वाचून व्हाल थक्क