Maharashtra Politics । शरद पवार गटाला मोठा धक्का; भाजपने निवडणूक आयोगात दाखल केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics । अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने माजी आमदार निलेश लंके (Sujay Vikhe Patil vs Nilesh Lanke) यांना उमेदवारी दिली आहे. अहमदनगरमध्ये यंदा अटीतटीची निवडणूक पाहायला मिळणार आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार सतत कोणत्या कोणत्या कारणावरून आमनेसामने येतात. अशातच आता भाजपने (BJP) शरद पवार गटाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. (Latest marathi news)

Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर जहरी टीका; म्हणाले, ‘माझ्या कामाचं श्रेय…’,

सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रचारसभेचं एक पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे याचा फोटो छापलेला आहे. यावरून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Ajit Pawar । “…. तर मी कोणाच्या बापाच ऐकत नाही,” अजित पवार स्पष्टच बोलले

शरद पवार गटाकडून आचारसंहितेचा भंग केला जातोय असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Election Commission । ठाकरे गटाला पुन्हा धक्का! निवडणूक आयोगाने बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Spread the love