Ajit Pawar । “…. तर मी कोणाच्या बापाच ऐकत नाही,” अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar

Ajit Pawar । महाराष्ट्रात बारामतीच्या जागेवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) यांच्यात लढत आहे, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जोरात प्रचार करताना दिसत आहेत.

Election Commission । ठाकरे गटाला पुन्हा धक्का! निवडणूक आयोगाने बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

नुकतीच अजित पवार यांची बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभा पार पडली. “आम्ही इतरांसारखे खोटं बोलत नाही. मला निवडून द्या, एमआयडीसी झाली नाही, तर 2019 मध्ये मत मागायला येणार नाही आणि मग पुन्हा मत मागायला यायच. मी जर त्या ठिकाणी असतो, तर मला शरमेने लाज वाटली असती. कोणत्या तोंडाने जाऊ मत मागायला. मी शब्दाचा पक्का आहे. सहजासहजी शब्द देत नाही आणि दिला तर कोणाच्या बापाच ऐकत नाही,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Mamata Banerjee । ममता बॅनर्जी यांचा पुन्हा अपघात, हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला आणि….

पुढे अजित पवार म्हणाले की, “मला तुमच्या पाठिंब्याची आणि तुमच्या पवित्र मताची गरज आहे. बारामतीसाठी 7 तारखेला मतदान आहे. त्यासाठी तीन मशीन येणार आहेत. पहिल्या मशीनमध्ये दोन नंबरला सुनेत्रा पवारांच नाव आणि शेजारी घड्याळ चिन्ह असेल ते बटण दाबा,” असं आवाहन अजित पवार यांनी उपस्थितांना केले आहे.

Nasim Khan । काँग्रेसमधील दलाल नेता कोण? नसीम खान यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Spread the love