Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर जहरी टीका; म्हणाले, ‘माझ्या कामाचं श्रेय…’,

Supriya Sule ajit pawar

Ajit Pawar । निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. सध्या देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या सभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर जोरदार टीका केली. सुळे यांनी केलेल्या विकासकामांचा पुस्तकात समावेश करून त्याचे श्रेय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

Ajit Pawar । “…. तर मी कोणाच्या बापाच ऐकत नाही,” अजित पवार स्पष्टच बोलले

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, “मी केलेले काम सुप्रिया सुळे यांच्या प्रचार साहित्यात दाखवले जात आहे. या सर्व गोष्टी त्यांनीच केल्याचे यावेळी दिसते. बारामतीतील सर्व इमारती मी बांधल्या आहेत, पण त्यांचे फोटो त्यांच्या पुस्तकांत प्रसिद्ध आहेत. सुप्रिया सुळे माझ्या कामाचे श्रेय त्यांच्या नावावर घेत आहेत. अशी जोरदार टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.

Election Commission । ठाकरे गटाला पुन्हा धक्का! निवडणूक आयोगाने बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

त्याचबरोबर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी आहे. मी तुमचा विकास करेन, पण तुम्हाला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबावे लागेल. असेही अजित पवार म्हणाले. मोदींचा अर्थसंकल्प मोठा असून, यापूर्वीच्या खासदारांच्या विरोधामुळे मतदारांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

Mamata Banerjee । ममता बॅनर्जी यांचा पुन्हा अपघात, हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला आणि….

Spread the love