Supriya Sule। ‘घटस्फोट होऊन सहा महिने झाले, पण….” सुप्रिया सुळेंच सर्वात मोठं वक्तव्य

Supriya Sule

Supriya Sule l शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार आणि बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.या निमित्ताने आज महाविकास आघाडीने मोठी सभा आयोजित केली होती. दरम्यान या सभेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर जहरी टीका केली आहे.

Car Accident । समृद्धी महामार्गावर कारवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात! २ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी

“आजपर्यंत स्थानिक निवडणूकमध्ये लक्ष घातलं नाही. कारण वडीलधारी मंडळी काम करत होते. लोकसभेनंतर ग्रामपंचायतपर्यंतच्या सर्व निवडणुका लढवायच्या असुन माझ्या कामाचा जाहीरनामा वाचल्यानंतर मतदार मला मतदान करतील. माझी लढाई ही अदृश्य शक्तीविरोधात असल्याने आम्ही ताकदीने निवडणूक लढणार आहोत. चिन्ह बदललं, आमचं चिन्ह चोरल गेलं. मी शारदाबाई पवार यांची नात आहे. माझ्या आजीने मला रडायला नाही लढाईला शिकविले आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

Supriya Sule । राजकीय वर्तुळात धक्कादायक बातमी समोर! सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं तब्बल 55 लाखांचं कर्ज

“कौतुक वाटतं टीकेचं. घटस्फोट होऊन सहा महिने झाले. पण 18 वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करत आहे. निवडणुका आमच्या हातात नाही तर जनतेच्या हातात आहे. लोक बोलतात धमकी येते. पण धमकी येत असेल मला फोन करा”, असं आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Viral News । बिस्कीट चोरले म्हणून दुकानदाराने 10 वर्षाच्या निष्पाप मुलाला रात्रभर केली मारहाण; थरकाप उडवणारी घटना

Spread the love