Lok Sabha Election 2024 । लोकसभेच्या मतदानाला सुरवात, पोलिसांचा चोख बंदोबस्त; महाराष्ट्रातील ‘या’ 5 जागांवर आज होणार मतदान

Loksabha Election 2024

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. 21 राज्यांमधील लोकसभेच्या 102 जागांवर आज मतदान होत आहे. तामिळनाडूतील सर्व 39 जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांवर मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीत प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आजपासून लोकशाहीचा उत्सव सुरू होत आहे. तरुण मतदारांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.

Bjp । भाजपला मोठे टेन्शन, या ठिकाणी पहिल्यांदाच उभा केला उमेदवार

महाराष्ट्रातील या 5 जागांवर मतदान होत आहे

महाराष्ट्रातील ज्या पाच जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे त्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात देखील आला आहे. मतदान करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Supriya Sule। ‘घटस्फोट होऊन सहा महिने झाले, पण….” सुप्रिया सुळेंच सर्वात मोठं वक्तव्य

पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या राज्यांमध्ये मतदान होणार?

मेघालय, मिजोरम, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालॅंड, राजस्थान,बिहार, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, जम्मू कश्मीर, मणिपुर, तमिळनाडु,उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, लक्षद्वीप, पॉंडेचरीमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Car Accident । समृद्धी महामार्गावर कारवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात! २ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी

Spread the love