Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान!

Devendr Fadanvis

Devendra Fadnavis । महाराष्ट्रात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील निवडणुका आहेत. या दिवशी मुंबईतील 6 जागांसह एकूण 13 जागांवर मतदान होणार आहे. राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजप (BJP) प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य समोर आले आहे.

Eknath Shinde । मतदानापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा दावा!

इंडियन एक्स्प्रेसला (Indian Express) दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजप हा विधानसभेत 115 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची संख्या जरी जोडली तरी भाजप खूप पुढे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मित्रपक्षांपेक्षा जास्त जागा जिंकू शकतो. पण याचा अर्थ भाजप मुख्यमंत्रीपदावर दावा करेल असा नाही. आमचे संसदीय मंडळ आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेईल.

Rakhi Sawant Health । हृदयाचा त्रास, किडनी निकामी, पोटात गाठ…राखी सावंत एकाच वेळी अनेक आजारांनी त्रस्त, धक्कादायक माहिती समोर

महायुतीत जागावाटप

महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत भाजप ‘मोठ्या भावाची’ भूमिका बजावत आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजप सर्वाधिक जागा लढवत आहे. महायुतीतील जागावाटप यापूर्वीच झाले असून, त्यानुसार भाजप २८ जागांवर, शिवसेना १५ जागांवर, राष्ट्रवादी ४ जागांवर आणि राष्ट्रीय समाज पक्ष १ जागेवर निवडणूक लढवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आणि राज्य सरकारचे काम लक्षात घेऊन आघाडीने 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Ajit Pawar Health । ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

Spread the love