Ashok Chavan । भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फडणवीस जे सांगतील ते काम…”

Ashok Chavan

Ashok Chavan । काँग्रेसला मोठा धक्का देत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar । निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शरद पवार बारामती लोकसभा मैदानात तळ ठोकणार; घेतला सर्वात मोठा निर्णय

याबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “नवीन सुरुवात करत आहे. भाजपची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेल. पक्ष जो आदेश देईल, फडणवीस जे सांगतील ते काम करणार आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचे देखील आभार मानले आहेत. त्यांनी सहकार्य केलं. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी आलो. मी आज जास्त बोलणार नाही. असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

Ashok Chavan । भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी अशोक चव्हाण यांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “आजपासून मी…”

चव्हाणांकडून मोदींच्या कामाचं कौतुक

यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले आहे. मोदींनी सबका साथ सबका विकास हे ब्रीद ठेवून अनेक कामे केली. आम्ही मोदींच्या कामावर इम्प्रेस झालो आहे. आम्ही विरोधात असतानाही आम्ही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही चांगल्या कामाचं कौतुक केलं. आता आजपासून पुढे आता आम्ही सर्वजण एकत्र काम करू, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

Sanjay Raut । अशोक चव्हाणांबाबत संजय राऊतांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट!

Spread the love