Sharad Pawar । निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शरद पवार बारामती लोकसभा मैदानात तळ ठोकणार; घेतला सर्वात मोठा निर्णय

Sharad Pawar

Sharad Pawar । राज्यात काही महिन्यातच निवडणुका (Loksabha election 2024) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच कारण असं की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत.

Vijay Vadettiwar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! विजय वडेट्टीवारही भाजपसोबत जाणार? बड्या नेत्याचा दावा

दोन्ही गट निवडणुकांच्या पार्शवभूमीवर शक्तिप्रदर्शन करणार आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार हे बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मैदानात तळ ठोकणार आहेत. यामुळे सर्वांचे बारामती मतदार संघाकडे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!

शरद पवार सलग चार दिवस विधानसभा मतदारसंघात बैठका घेणार असून पहिल्या दिवशी ते 15 फेब्रुवारीला बारामतीत आढावा बैठक घेतली. यानंतर 16 फेब्रुवारीला दौंड मतदारसंघाची बैठक घेतील. 17 फेब्रुवारीला इंदापूर पदाधिकाऱ्यांशी चर्चा, 18 फेब्रुवारीला पुरंदरला सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आणि नंतर 19 फेब्रुवारीला पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार आहेत.

Ajit Pawar । अशोक चव्हाणांचा राजीनामा अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “काहीतरी गडबड..”

Spread the love