Sanjay Raut । अशोक चव्हाणांबाबत संजय राऊतांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट!

Sanjay Raut

Sanjay Raut । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) मंगळवारी काँग्रेसचा (Congress) राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार असून उद्या म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का देत अशोक चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Latest Politics News)

Vijay Vadettiwar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! विजय वडेट्टीवारही भाजपसोबत जाणार? बड्या नेत्याचा दावा

अशोक चव्हाण हे एकनाथ शिंदे गेले त्यावेळीच काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. ते 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्ष सोडणार होते. अशोक चव्हाण हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपड करत होते. त्यांना आता त्यासाठी मुहूर्त मिळाला, असा मोठा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!

दरम्यान, अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करू शकतात कारण भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेचे तिकीट देऊ शकते. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि उद्या 14 फेब्रुवारीला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण थेट दिल्लीला रवाना होतील, असे मानले जात आहे.

Ajit Pawar । अशोक चव्हाणांचा राजीनामा अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “काहीतरी गडबड..”

Spread the love