Ashok Chavan । ब्रेकिंग! अखेर अशोक चव्हाण यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

Ashok Chavan

Ashok Chavan । लहानपणापासूनच काँग्रेसच्या विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. फक्त अशोक चव्हाणच नाही तर त्यांचे समर्थक अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयामध्ये उपस्थित होते.

Sharad Pawar । निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शरद पवार बारामती लोकसभा मैदानात तळ ठोकणार; घेतला सर्वात मोठा निर्णय

कोण आहेत अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1958 रोजी झाला. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. अशोक चव्हाण यांचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूलमधून पूर्ण झाले. त्यांनी विज्ञान विषयात पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता या भोकर मतदारसंघातून आमदार आहेत. अशोक चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया या दोन जुळ्या मुली आहेत.

Ashok Chavan । भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी अशोक चव्हाण यांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “आजपासून मी…”

अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास कसा?

अशोक चव्हाण यांना त्यांचा राजकीय वारसा त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्याकडून मिळाला. त्यांनी 1986 मध्ये काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विभागाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यानंतर राजकीय पदार्पण केले. अशोक चव्हाण यांनी 1987-89 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून तिकिटावर निवडणूक लढवली आणि खासदार झाले. त्यांनतर त्यांनी 1992 मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळात पदार्पण केले.

Sanjay Raut । अशोक चव्हाणांबाबत संजय राऊतांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट!

अशोक चव्हाण 1992 मध्ये एमएलसी म्हणून निवडून आले आणि महाराष्ट्र विधान परिषदेत पोहोचले. मार्च 1993 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह राज्यमंत्री म्हणून रुजू झाले. अशोक चव्हाण 1999 मध्ये मुदखेड मतदारसंघातून विजयी झाले आणि महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले. 2003 मध्ये अशोक चव्हाण यांची वाहतूक, बंदरे, सांस्कृतिक कार्य आणि प्रोटोकॉल मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर 2004 मध्ये अशोक चव्हाण यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात उद्योग, खाणकाम, सांस्कृतिक व्यवहार आणि प्रोटोकॉल खात्याची जबाबदारी देण्यात आली. अशोक चव्हाण हे 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. आदर्श गृहनिर्माण घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्यानंतर 2010 मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Vijay Vadettiwar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! विजय वडेट्टीवारही भाजपसोबत जाणार? बड्या नेत्याचा दावा

Spread the love