Accident News । महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Accident News

Accident News । अहमदनगर : सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा हे अपघात (Accident) चालकाच्या चुकीमुळे होतात. यात अनेकांचा जीव जातो. यामुळे अनेक संसार उध्वस्त होतात. सध्या असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात (Container Accident) झाला आहे. (Latest marathi news)

India Alliance । इंडिया आघाडीला पुन्हा मोठा धक्का! नितीश कुमार यांच्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर मन सुन्न करणारा भीषण अपघात झाला आहे. (Ahmednagar-Sambhaji Nagar Highway Accident) वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की या दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

OBC Meeting । मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ आक्रमक, बैठकीत घेतला मोठा निर्णय

दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांचा संताप पाहता कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत कुटुंबीय वडगाव सावताळ (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी असून ते रविवारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर एकाच स्कूटीवरून घरी परत येत होते.

Maldives parliament । मोठी बातमी! संसदेत दोन खासदारांमध्ये तुफान हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल

Spread the love