Lumpy Skin Disease । राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण! लम्पी आजाराचा प्रादुर्भाव, जनावरांचे बाजार बंद

An atmosphere of anxiety among farmers in the state! Lumpy disease outbreak, animal markets closed

Lumpy Skin Disease । राज्यात मागील काही दिवसांपूर्वी कोरोनानंतर लम्पी (Lumpy) आजाराने धुमाकूळ घातला होता. अशातच आता पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे. याचा दूध उत्पादनावरही (Milk Production) परिणाम होत आहे. त्यामुळे पशुपालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन सरसकट जनावरांचे लसीकरण करण्याच्या सूचना सध्या दिल्या जात आहेत. (Lumpy Disease)

Rain Update । शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी! ‘या’ दिवशी होणार पावसाचे आगमन

शेवगाव तालुक्यातील एकूण ५१६ जनावरे या आजाराने त्रस्त आहेत. यामध्ये १७ जनावरांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ३६३ जनावरे बरी झाली आहेत तर १३६ जनावरे आजारी आहेत. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यातील जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. पशुपालकांनी जर आवश्यक ती काळजी घेतली तर या आजाराचा प्रसार थांबू शकतो. (Latest Marathi News)

Ajit Pawar । बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी, बायको म्हणते, “जरा दमानं घ्या..”

कसा होतो आजाराचा प्रसार?

या आजाराचा प्रसार चावणाऱ्या कीटक जसे की, माशा, डास, गोचीड, कीटक, चिलटे यांच्यामार्फत होतो.
त्याशिवाय निरोगी जनावर बाधित जनावराच्या संपर्कात आल्यानंतरही हा आजार होतो.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; माजी आमदाराने केला शिंदे गटामध्ये प्रवेश

अशाप्रकारे घ्या जनावरांची काळजी

  1. जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत.
  2. हा संसर्गजन्य आजार असल्याने वेळेत प्रतिबंधात्मक लसीकरण करा.
  3. गायी आणि म्हशींना एकत्र बांधू नये, तसेच बाधित जनावर स्वतंत्र बांधावे.
  4. जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळली तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
  5. बाधित जनावरांचा मृत्यू झाल्यास 8 ते 9 फूट खोल खड्डयात मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकून विल्हेवाट लावावी.

Crop Insurance । पावसाअभावी पिकाचे मोठे नुकसान! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

जाणून घ्या लक्षणे

  • या आजारामध्ये जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते.
  • जनावरांना ताप येतो
  • जनावरे चारा आणि पाणी कमी पितात, तसेच त्यांचे दूध कमी होते.
  • हळूहळू जनावरांचे डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी यायला सुरुवात होते.
  • डोळ्यातील व्रणामुळे चिपडे यायला सुरुवात होते. जनावरांच्या डोळ्यांची दृष्टी बाधित होते.

Accident News । महामार्गावर भीषण अपघात! गाडीचा टायर फुटून घडला मोठा अनर्थ

Spread the love