Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; माजी आमदाराने केला शिंदे गटामध्ये प्रवेश

Big shock to Uddhav Thackeray; The former MLA joined the Shinde group

Uddhav Thackeray । मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. या बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांना सतत धक्के बसत आहेत. अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाची गळती अजूनही सुरूच आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते यांनी शिंदे गटांमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश केला आहे.

Crop Insurance । पावसाअभावी पिकाचे मोठे नुकसान! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

फक्त आमदार तुकाराम काते यांनीच नाही तर त्यांच्या पत्नी व बीएमसीच्या माजी नगरसेविका समृद्धी काते यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील अणुशक्तीनगरचे तुकाराम काते हे आमदार असून ते ठाकरे गटाचे विद्यमान शाखाप्रमुख होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेस ने दिले आहे.

Accident News । महामार्गावर भीषण अपघात! गाडीचा टायर फुटून घडला मोठा अनर्थ

शिंदे गटात प्रवेश करताच तुकाराम काते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि मुंबईच्या कायापालटात योगदान देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं काते म्हणाले आहेत”. दरम्यान ठाकरे गटासोबतच काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे बृहमुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सात माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Astrology | नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी वास्तूशांती का करतात? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचं कारण

Spread the love