Crop Insurance । पावसाअभावी पिकाचे मोठे नुकसान! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Big loss of crop due to lack of rain! 'These' farmers will get compensation

Crop Insurance । बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) यावर्षी राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावली. अशातच संपूर्ण राज्यात चांगला पाऊसही (Rain in Maharashtra) पडला नाही. ऑगस्ट महिना संपत आला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा चांगलाच चिंतेत सापडला आहे. पावसाअभावी पेरणी केलेली पिके वाया गेली आहेत. या शेतकऱ्यांना आता विम्याचे पैसे (Insurance) मिळणार आहेत. (Latest Marathi News)

Accident News । महामार्गावर भीषण अपघात! गाडीचा टायर फुटून घडला मोठा अनर्थ

पाऊस न पडल्याने परभणी जिल्ह्यातील सोयाबीन पीक वाया गेले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यातल्या ज्या ११ महसूल मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला होता त्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

Astrology | नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी वास्तूशांती का करतात? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचं कारण

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करण्याचे निर्देश आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. या महसूल मंडळातील विमा धारकांना नुकसान भरपाई रकमेच्या २५ % आगाऊ रक्कम खात्यात जमा करावी लागणार आहे. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Sanjay Shirsath । “हिम्मत असेल तर अजित पवारांना गद्दार म्हणून दाखवा” संजय शिरसाठ यांचे मोठे वक्तव्य

१ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी काढला विमा

यावर्षी राज्यात तब्बल १ कोटी ७० लाख ४८ हजार ९६३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. ढगफुटी, पूर, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं नुकसान झाले तर नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत त्याबाबत माहिती शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला देणे गरजेचे असते. तरच त्यांना त्याचा लाभ मिळतो. शिवाय पीक विम्याची तारीखही खूप महत्त्वाची असते.

Samruddhi Mahamarg । समृद्धी महामार्गावर 8 महिन्यांमध्ये 729 अपघात! अहवालात धक्कादायक माहिती समोर

Spread the love