Accident News । महामार्गावर भीषण अपघात! गाडीचा टायर फुटून घडला मोठा अनर्थ

A terrible accident on the highway! A big accident happened when the tire of the car burst

Accident News । पुणे : सततचे अपघात पाहता देशात वाहतुकीसंदर्भातील नियम (Traffic Rule) कडक केले आहेत. तरीही अपघाताचे सत्र सुरूच आहे. काही वाहन चालकांकडून नजरचुकीने नियम मोडले जातात तर काही जाणूनबुजून नियम मोडतात. एका चुकीमुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. अपघात (Accident) कमी करण्याबाबत सतत चर्चा सुरु असते. परंतु अजूनही त्यावर कोणता ठोस उपाय निघाला नाही. (Latest Marathi News)

Astrology | नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी वास्तूशांती का करतात? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचं कारण

असाच एक भीषण अपघात पुणे बंगळुरु महामार्गावर (Pune Bangalore Highway Accident) झाला आहे. मुंबईहून जयसिंगपूरला जात असणाऱ्या गाडीचा टायर फुटला आणि ही गाडी दुसऱ्या गाडीवर आदळली. (Car Accident) हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्य झाला तर चार जण जखमी झाले आहेत. निखिल शशिकांत चौखंडे (वय 30 वर्षे), प्रियांका निखिल चौखंडे (वय 25 वर्षे) आणि शशिकांत यदुनाथ चौखंडे (वय 63 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

Sanjay Shirsath । “हिम्मत असेल तर अजित पवारांना गद्दार म्हणून दाखवा” संजय शिरसाठ यांचे मोठे वक्तव्य

हे सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. त्यांनी जखमींना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Samruddhi Mahamarg । समृद्धी महामार्गावर 8 महिन्यांमध्ये 729 अपघात! अहवालात धक्कादायक माहिती समोर

Spread the love