सध्या पावसाळ्याचे दिवस (Rainy days) सुरु आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नद्या- नाले आणि धरणे पावसाने तुडुंब भरली आहेत. मागील आठवड्यापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेकजण आता निसर्गाचे हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी फिरायला जात आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर (Tourist places) गर्दी पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
Salman Khan । भाईजानलाही ‘बार्बी’ची भुरळ! हटके लूक पाहून नेटकरी कोड्यात, पहा व्हायरल व्हिडिओ
पुण्यातही (Pune) फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. सुट्टीच्या दिवशी तर शहरात मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. जर तुम्हीही पुण्यात फिरायला जात असाल तर पुण्यातील खाण्याच्या (Food Place in Pune) काही नक्की भेट द्या. अनेकजण या ठिकाणी येऊन स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेत आहेत. कोणती आहेत ही ठिकाणी? पहा सविस्तर. (Famous Food Place in Pune)
मुंबईतील सर्वात स्वस्त पदार्थ म्हणून वडापावची ओळख होती. परंतु तुम्हाला हा पदार्थ देशात कोठेही खाऊ शकता. तुम्ही पुण्यातील जेजे गार्डन वडापाव, गार्डन वडापाव सेंटर आणि एस कुमार वडेवाले येथे स्वादिष्ट वडापाव चाखू शकता. अनेकजण या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी गर्दी करतात.
DA Hike । केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा! ‘इतका’ वाढणार पगार, जाणून घ्या सविस्तर
खवय्यांना मावा केक खूप आवडतो. एका मोठ्या लोखंडी कढईत दूध आटवून मावा स्वत: तयार केला जातो. तुम्ही तो चहा किंवा कॉफीसोबत खाऊ शकता. तुम्ही आता पुण्यातील कयानी बेकरी आणि बंगळुरू बेकरी मध्ये चविष्ट मावा केक खाऊ शकता.
जर तुम्ही पुण्यात असाल तर एकदा पुण्याची मिसळपाव ट्राय करा. तुम्ही श्रीकृष्ण भुवन, काटाकिर्र आणि मिसळ कट्टा कर्वे नगर या ठिकाणी लज्जतदार मिसळ खाऊ शकता. फरसाण, शेव, लिंबू,कांदा आणि कोथिंबीर शिवाय लोणी किंवा ताकाबरोबर सर्व्ह केलेली मिसळ पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.
NCP Pawar Camp Meeting । आज पार पडणार शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक, कोणती रणनीती आखणार?
तुम्ही इंडियामार्ट, कृष्णा डायनिंग आणि चटणी ये ठिकाणी पुण्यातील लोकप्रिय टोमॅटोची भाजी ट्राय करू शकता. एकदा तुम्ही ही भाजी खाल्ली तर तुम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी येऊ शकता.
Sania-Shoaib Divorce । सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट होणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
त्याशिवाय तुम्ही वडापाव, मिसळ यांसारख्या पदार्थांना कंटाळला असाल तर तुम्ही पुण्यातील आओजी खाओजी, हॉटेल जगदंबा आणि दुर्वांकुर डायनिंग हॉल येथे महाराष्ट्रीयन थाळी ट्राय करू शकता. अनेकजण आवडीने या ठिकाणी महाराष्ट्रीयन थाळी खाण्यासाठी येतात. या थाळीमध्ये तुम्हाला भाजी, कढी (सूप), डाळ भात, चपाती, दाल खिचडी, भाकरी, दशी वडा पापड, थालीपीठ, कोशिंबीर तसेच मिठाई असे पदार्थ चाखू शकता.
Rahul Gandhi । ब्रेकिंग! राहुल गांधी यांना खासदारकी मिळणार; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा