Ganpat Gaikwad । भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह अन्य शिवसैनिकांवर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान आता आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत एक मोठी आणि महत्वाची माहिती समोर आली आहे.
गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सध्या गणपत गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Mahesh Gaikwad । ICU मध्ये उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक; तरीही महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
उल्हासनगर या ठिकाणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात कोर्टाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.