Manoj Jarange Patil । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. जरांगे यांनी फक्त आरोपच केले नाहीत तर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याकडे देखील रवाना झाले. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जरांगे यांनी सागर बंगल्यावर जाण्याचा आपला निर्णय तात्पुरता मागे घेल्याची माहिती मिळत आहे.
अंतरवाली सराटी गावात जाऊन आम्ही बैठक घेऊ त्याचबरोबर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. सध्या जरांगे पाटील यांचा ताफा जालन्याच्या भांबेरी गावातून अंतरवाली सराटीकडे निघाला आहे.
आज दुपारी अंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक होणार आहे. या बैठकीला अनेक मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर संचारबंदी उठवा मुंबईमध्ये येऊन दाखवतो असं आव्हान देखील जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “राज्य सरकारने आम्हाला मुंबईमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी ठिकठिकाणी ५ ते १० हजार पोलिसांचा बंदोबस्त उभा केला असून ते आम्हाला मुंबईमध्ये शिरू देणार नाहीत. जर मी मुंबईमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तर मराठा आंदोलकांना त्रास होईल. मी कोणत्याही मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Eknath Shinde । “खालच्या पातळीवरचे आरोप खपवून घेणार नाही” मनोज जरांगेंना मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा