
Ajit Pawar । बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांवर ताशेरे ओढले आहेत. कारखान्याच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी संचालकांवर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना गंभीर इशारा दिला. अजित पवार म्हणाले की, “संचालक आपल्या ट्रॅक्टरला रिकामा करायला वॉचमनला धाक दाखवून ट्रॅक्टर रिकामे करून घेतात. असं काही होऊ नये. यापूर्वी या कारखान्यात अशी पद्धत कधीही नव्हती.”
Deenanath Hospital l दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय: डिपॉझिट न घेण्याचा ठराव
आधुनिक व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून हे एक चुकीचं वर्तन असल्याचं पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “कारखान्यात ट्रॅक्टर घेऊन आल्यावर चालक फोन करतो आणि संचालक तिथे येऊन वॉचमनला धमकावतात, हे काय पद्धत आहे? असं काहीही या कारखान्यात कधीच नव्हतं.” अजित पवार यावेळी आणखी म्हणाले की, संचालकांची भूमिका म्हणजे काहीतरी विशेष आणि सन्माननीय असायला हवी, आणि त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत वॉचमनला धाक देणे योग्य नाही.
Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात अलर्ट जारी! वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज
संचालकांनी ही पद्धत बदलून सन्मानाने आणि योग्य व्यवस्थापन पद्धतीने कारखान्याचा कारभार चालवावा, असं अजित पवार यांना वाटत आहे. त्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे संकेत दिले. यावेळी अजित पवारांनी कारखान्याच्या कामकाजावर सकारात्मक टिप्पणी केली, पण हेही सांगितले की, अशा वर्तमनाच्या पद्धतीमुळे इतर लोकांमध्ये नकारात्मक संदेश जाऊ शकतो. त्यामुळे ही पद्धत आता बदलावी लागेल, असा इशारा अजित पवारांनी दिला.
Shrigonda News । श्रीगोंदा तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबित, शासकीय आदेशात अनियमितता