
Deenanath Hospital l दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाने आता अत्यवस्थ रुग्ण किंवा प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या कोणत्याही रुग्णांकडून डिपॉझिट रक्कम न घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित सुरू करण्यात येणार आहे.
तनिषा भिसे प्रकरणानंतर रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. भाजप आमदार अमित गोरखे यांच्या सहकारी सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले होते. रुग्णालयाने दाखल होणाऱ्या रुग्णांकडून दहा लाख रुपयांच्या डिपॉझिटची मागणी केली होती, ज्यामुळे एक मोठा वाद उभा राहिला.
Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात अलर्ट जारी! वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तात्काळ चौकशी सुरू केली आणि पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली. या चौकशीदरम्यान रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. यानंतर रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
रुग्णालयाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांकडून डिपॉझिट घेतले जात नव्हते, परंतु उपचारांची किंमत वाढल्यामुळे डिपॉझिट घेण्याची पद्धत सुरू झाली होती. आता, इमर्जन्सी, प्रसूती किंवा बालरोग विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून कोणतीही अनामत रक्कम घेतली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
Blue Drum Case । निळ्या ड्रमने निर्माण केली दहशत, सौरभ हत्याकांडामुळे देशभर निळ्या ड्रमचीच चर्चा
या निर्णयामुळे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा फायदा होईल. रुग्णालयाच्या या निर्णयामुळे रुग्णालयाची प्रतिमा पुन्हा एकदा विश्वासार्ह होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.