Shrigonda News । श्रीगोंदा तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबित, शासकीय आदेशात अनियमितता

Shrigonda News

Shrigonda News । श्रीगोंदा तालुक्यात गाजलेल्या चर्च जमिनीच्या शासकीय आदेशात अनियमितता केल्याप्रकरणी श्रीगोंदा तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूल आणि वन विभागाच्या आदेशांचा उल्लंघन करत एका संस्थेचे नाव बदलून खाजगी व्यक्तींना मालकी हक्क दिल्याने या कारवाईला तोंड दिलं.

Blue Drum Case । निळ्या ड्रमने निर्माण केली दहशत, सौरभ हत्याकांडामुळे देशभर निळ्या ड्रमचीच चर्चा

तक्रारीनुसार, “द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ खाईस्ट इतर वेस्टर्न इंडिया” या संस्थेचे नाव कमी करून “द कॅनेडीयन प्रेस ब्रिटेरियन मिशन” म्हणून बदल करण्यात आले आणि त्यानंतर खासगी व्यक्तींना जमिनीचे मालकी हक्क देण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. यावरून तक्रारदारांनी प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि चौकशी सुरू केली.

Santosh Deshmukh | सर्वात मोठी बातमी! अखेर सुदर्शन घुलेने कबूल केले, संतोष देशमुख हत्येच्या मागे कराडचा हात!

चौकशी दरम्यान, महसूल आणि वन विभागाने केलेल्या आदेशाच्या उल्लंघनामुळे नियमांची कत्तल झाल्याचं स्पष्ट झालं. सगळ्या प्रक्रियेत अनियमितता आढळल्याने श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

निलंबनाच्या आदेशानंतर, राज्यातील सरकारी नियमांची पायमल्ली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाऊ लागली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ आणि शिस्त व अपील नियम १९७९नुसार या दोन्ही अधिकार्यांवर विभागीय चौकशी सुरू केली जाईल.

Devendra Fadnavis । राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!

ही कारवाई श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण करणारी ठरली असून, प्रशासनाने या प्रकरणाच्या तपासात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

Spread the love