Eknath Shinde । “एकनाथ शिंदे हेच जनतेच्या ह्रदयातील मुख्यमंत्री” शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Eknath Shinde

Eknath Shinde । शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी एक मोठं आणि चर्चेचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, “जरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी, तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत.” धैर्यशील माने हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात असताना बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा तापली आहे.

Deenanath Hospital l दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय: डिपॉझिट न घेण्याचा ठराव

माने यांनी पुढे सांगितले की, विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदारसंघातील लोकांना आवाहन केलं होतं की, “तुम्ही आबिटकर यांना आमदार करा, त्यांना नामदार आम्ही करतो.” त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळला आणि आबिटकर मंत्री बनले. माने यांनी तसेच सांगितलं की, “कोल्हापूरमध्ये महायुतीचे सर्व दहा आमदार निवडून आले आहेत, यामध्ये पाच आमचे आहेत.” ते म्हणाले की, “आमच्या पक्षाचं वलय वाढतंय, कारण आमचं नेतृत्व खंबीर आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखं नेतृत्व मिळालं हे आमचं भाग्य आहे.”

Ajit Pawar । अजित पवारांचा छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना इशारा! म्हणाले…
.

तर, भाजप नेते नारायण राणे यांनी धैर्यशील माने यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांनी म्हटलं की, “तुम्ही आग लावण्याचं काम करत आहात, पण मी आज चांगल्या दिवशी उत्तर देणार नाही.” तसेच ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे 50 वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात आहेत, ते मुख्यमंत्री आणि मंत्री राहिले आहेत.” राणे यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वातावरण चांगलच तापले आहे.

Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात अलर्ट जारी! वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज

Spread the love