Ahmednagar Politics । अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ! सुजय विखे 5 वर्षे फिरकलेच नाहीत, भाजपच्या 100 कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

Sujay Vikhe Patil

Ahmednagar Politics । राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. या ठिकाणी भाजपच्या तब्बल 100 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे अहमदनगरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदेंचं बारामतीबाबत मोठं वक्तव्य

भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे नाराजी कळवत राजीनामे दिले आहेत. सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि यामध्ये आता 100 कार्यकर्त्यांनी राजीनामा भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis । फडणवीसांचं सुनेत्रा पवारांबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले; “आता सुनबाई दिल्लीला…”

विखेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याचं सुनील रासने यांनी म्हटलं आहे. विकासकामे सोडून सुजय विखे हे इतर कामावरच अधिक भर देत असल्याचं म्हणत उमेदवार बदलण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. आणि त्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar । अजित पवारांनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले; “हलक्या कानाचे राहू नका”

विखे पाटील 5 वर्षे मतदारसंघात फिरकलेच नाहीत

निवडून गेल्यानंतर खासदार सुजय विखे पाटील यांचा मतदार संघाशी संपर्क मोठया प्रमाणात तुटला आहे. नागरिकांचे, कार्यकत्यांचे फोन न उचलणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणने ऐकून न घेता त्याला सुमार दर्जाचा सल्ला देणे, या स्वभावामुळेच कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.

Madha Loksabha । देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का; जवळच्या विश्वासू नेत्याने दिला शरद पवारांना पाठिंबा

Spread the love