Ajit Pawar । अजित पवारांनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले; “हलक्या कानाचे राहू नका”

Ajit Pawar

Ajit Pawar । बारामती मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्यांदाच बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे (Sunetra Pawar Vs Supriya Sule) यांच्यात लढत पार पडणार आहे. पवार कुटुंबातील दोन सदस्य निवडणुकीला उभे राहिल्याने मतदार कोणाला निवडून देणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. (Latest marathi news)

Money Laundering । ब्रेकिंग! शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची धाड, पुण्यातील बंगल्यासह ९८ कोटींची मालमत्ता जप्त

आज सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असून यावेळी महायुतीकडून पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. बोलताना अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे.

Madha Loksabha । देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का; जवळच्या विश्वासू नेत्याने दिला शरद पवारांना पाठिंबा

“ही गावकी भावकीची निवडणूक नसून देशाची निवडणूक आहे, देशात विकास कोण करेल. पंतप्रधान मोदी यांनी तडफदार आक्रमकपणे विकासकामे केली. आहेत. अजिबात हलक्या कानाचे राहू नका, सध्या बनवाबनवी सुरू असल्याने कुणाचं ऐकू नका. पुरंदर दौंड इंदापूरसाठी पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून कोणाचेही पाणी चोरलं जाणार नाही सगळ्यांना हक्काने पाणी मिळेल,” असेही अजित पवारांनी आश्वासन दिले आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज, म्हणाल्या, “मला विश्वास आहे की…”

Spread the love