Devendra Fadnavis । फडणवीसांचं सुनेत्रा पवारांबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले; “आता सुनबाई दिल्लीला…”

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis । पुणे : बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) यंदा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्यांदाच बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे (Sunetra Pawar Vs Supriya Sule) यांच्यात लढत पार पडणार आहे. आज सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असून यावेळी महायुतीकडून पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.

Ajit Pawar । अजित पवारांनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले; “हलक्या कानाचे राहू नका”

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांबाबत मोठं वक्तव्य केले आहे. “बारामतीकरांच्या मनामनात सुनबाई सुनेत्रा पवार असून बारामती मतदारसंघाचा फैसला आजच्या सभेनेच केला आहे. बारामतीला आणि वहिनींना कुणीच थांबवू शकत नाही,” असा देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Money Laundering । ब्रेकिंग! शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची धाड, पुण्यातील बंगल्यासह ९८ कोटींची मालमत्ता जप्त

पुढे फडणवीस म्हणाले की, “नवीन इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील. अजित पवार यांनी बारामतीसाठी खूप मेहनत घेतली आहे. बारामतीच्या विकासात अजित पवारांचा मोलाचा वाटा आहे. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक मोदी विरुद्ध गांधी अशी आहे. विकासाला मत द्यायचे की विनाशाला मत द्यायचे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे,” असे आवाहनही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Madha Loksabha । देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का; जवळच्या विश्वासू नेत्याने दिला शरद पवारांना पाठिंबा

Spread the love