Delhi Crime । नवी दिल्ली : राज्यात कायदे कडक केले तरीही अत्याचाराच्या (Crime) घटना कमी झाल्या नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणाने एका वृद्ध महिलेवर अत्याचार करून नंतर तिचे ब्लेडने ओठ कापले आहेत. या वृद्ध महिलेच्या गुप्तांगाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)
Rain in Maharashtra । राज्यात पावसाचे दमदार आगमन, ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस
अशी धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. नेताजी सुभाष प्लेस परिसरामध्ये शुक्रवारी पहाटे 4 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. पीडित वृद्ध महिला झोपली असताना हा तरुण घरात शिरला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला बेदम मारहाण करून तिचे ब्लेडने ओठ कापले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) 28 वर्षीय आरोपी आकाशला अटक करण्यात आली आहे. (Delhi News)
दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय त्यांनी याप्रकरणाची दिल्ली पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागवून घेतली आहे. अधिक तपास दिल्ली पोलिसांकडून सुरु आहे.
Load Shedding । राज्यात पुन्हा लोडशेडिंग! दररोज ‘इतके’ तास गायब होणार वीज