
राजस्थान | सध्या राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील प्रतापगडमध्ये एका गर्भवती महिलेला निर्वस्त्र करत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 31 ऑगस्ट रोजी एका महिलेच्या पतीने निर्वस्त्र करून संपूर्ण गावभर फिरवले होते. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राजस्थानमध्ये चांगली खळबळ उडाली होती.
Load Shedding । राज्यात पुन्हा लोडशेडिंग! दररोज ‘इतके’ तास गायब होणार वीज
यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी आठ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कडक कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत. दरम्यान या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
Jalna lathi charge । लाठीचार्जने वातावरण तापलं! मराठा आंदोलक घेणार मोठा निर्णय
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला रडताना दिसत आहे. त्याचबरोबर तिचा पती आणि कुटुंबीय निर्वस्त्र करून तिला मारहाण करत असल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे संपूर्ण प्रकरण समोर येताच प्रतापगडचे पोलीस अधीक्षक गावात पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! आज शरद पवार जालन्यातील जखमी आंदोलकांची घेणार भेट