
Politics News । नवी दिल्ली : भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आगामी निवडणुकीत तगडे आव्हान देण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. त्यांच्या या आघाडीला इंडिया (INDIA) असे नाव देण्यात आले आहे. यात कॉंग्रेससह देशातल्या 28 विरोधी पक्षांचा समावेश आहे. विरोधकांची ही नवीन एकजूट भाजपला पराभूत करेल का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)
Viral Video । धक्कादायक! विद्यार्थिनींनी फोडली थेट शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी, काय आहे प्रकरण?
दरम्यान, या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. आज समन्वय समितीची पहिली बैठक पार पडणार आहे. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. परंतु या बैठकीला इंडिया आघाडीतील एक पक्ष गैरहजर राहणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.
Ajit Pawar । अजित पवार गटाला मोठा धक्का, ट्विटरकडून कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत अधिवेशनातील रणनीतीबाबतच चर्चा होईल. या बैठकीला सीपीएम (CPM) पक्ष उपस्थित राहणार नाही. दरम्यान, या पक्षाने इंडिया आघाडीच्या कोणत्याही बैठकीत सामील होण्याबाबतचा निर्णय घेतला नाही. येत्या 16 आणि 17 सप्टेंबर रोजी उच्च स्तरीय पॉलिट ब्यूरोची बैठक होणार असून त्यात इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील व्हायचे की नाही? यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
Aurangabad Crime । माजी उपसभापतीच्याच लॉजवर सुरु होता नको तो प्रकार, पोलिसांनी धाड टाकली आणि…
या पक्षाशिवाय या बैठकीला जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह प्रकृती ठिक नसल्याने हजर राहणार नाहीत. तसेच टीएमसीच्यावतीने अभिषेक बॅनर्जीही ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने बैठकीला हजर राहणार नाहीत. दरम्यान, आज संध्याकाळी 4 वाजता ही बैठक पार पडेल.
Gold Silver Price Today । ग्राहकांनो चला खरेदीला! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने-चांदी