Viral Video । धक्कादायक! विद्यार्थिनींनी फोडली थेट शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी, काय आहे प्रकरण?

Students directly broke the education officer's car, what is the matter?

Viral Video । अलीकडच्या काळात मुलांपेक्षा मुलींचे शिक्षण (Education) घेण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा झेंडा रोवला आहे. असे कोणतेच क्षेत्र नाही की ज्यात त्यांनी कामगिरी केली नाही. शासनाकडून मुलींसाठी वेगवेगळ्या योजना (Government Schemes) राबवल्या जातात. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. परंतु एका शाळेतील विद्यार्थिनींनी थेट शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Girl Students Vandalise Car)

Ajit Pawar । अजित पवार गटाला मोठा धक्का, ट्विटरकडून कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार,बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील ही घटना आहे. या विद्यार्थिनींना शाळेत बसण्याची योग्य व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींमध्ये नाराजी पसरली होती. त्यांनी सर्वात अगोदर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यानंतर त्या थेट माहनर शिक्षण अधिकाऱ्याला भिडल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Sosial Media) होत आहे. (Latest Marathi News)

Aurangabad Crime । माजी उपसभापतीच्याच लॉजवर सुरु होता नको तो प्रकार, पोलिसांनी धाड टाकली आणि…

संतप्त विद्यार्थिनींनी शिक्षण अधिकाऱ्याची गाडी फोडली. त्यात गाडीचे मोठं नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसोबतही त्यांनी बाचाबाची केली असून यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. त्यावेळी महिला पोलिसांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप मुलींनी केला आहे. लवकरच या विद्यार्थिनींची मागणी मान्य केली जाईल, असे आश्वासन शाळा प्रशासनाने दिले आहे.

Gold Silver Price Today । ग्राहकांनो चला खरेदीला! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने-चांदी

Spread the love