Gold Silver Price Today । ग्राहकांनो चला खरेदीला! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने-चांदी

Consumers, let's go shopping! Gold and silver that can be bought 'so' cheap

Gold Silver Price Today । जागतिक घडामोडीचा परिणाम भारतीय बाजारावर होत असतो. अमेरिकेत प्रचंड महागाई झाली आहे. याचा परिणाम सोने (Gold) आणि चांदीवर (Silver) झाला आहे. तसे सोने आणि चांदी प्रत्येक भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेकजण एखाद्या चांगल्या प्रसंगी किंवा एखाद्या सणाच्या निमित्ताने सोने खरेदी करतात. त्याशिवाय अनेकजण दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी देखील सोने खरेदी करतात. (Latest Marathi News)

Crime News । धक्कादायक बातमी! दक्षिण कोरियाच्या महिलेचा भर रस्त्यात भारतीय नागरिकाने केला लैंगिक छळ; पाहा Video

जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा एकदा कमालीची घसरण झाली आहे. इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशनने नवीन सोन्या-चांदीचे (Gold Silver Price) भाव जाहीर केले आहेत. निम्मा सप्टेंबर महिना संपत आला तरी या दोन धातूंची पडझड थांबली नाही.

Pune News | पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींचा घोटाळा, धक्कादायक माहिती आली समोर

असे आहेत सोन्याचे दर

इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या नवीन दरानुसार 22 कॅरेट सोने 54990 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचे दर 59,990 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. या महिन्यात सोन्याच्या भावात एकूण 600 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी ही उत्तम संधी आहे. (Gold Price Today)

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, पोलिसांकडून हुल्लडबाजांवर लाठीचार्ज; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

असे आहेत चांदीचे दर

इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या नवीन दरानुसार एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये इतका आहे. दरम्यान या महिन्यात चांदी तब्बल 4000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही धातूंवर कोणताही कर आणि शुल्क नसते. सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश असतो, त्यामुळे भाव बदलतात. (Silver Price Today)

Accident News । भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसचा टँकर पलटी

Spread the love