Supriya Sule । राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फूट नाहीच’, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं खळबळ

Supriya Sule

Supriya Sule । राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. याला कारणही अगदी तसंच आहे. मागील वर्षी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) मोठी फूट पाडली. तसेच निवडणूक आयोगाने अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यांनंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. (Latest marathi news)

Manoj Jarange Patil । …तर जेलमध्येही मोर्चा काढणार, जरांगे पाटलांनी सरकारला दिलं खुलं आव्हान

“मी एक तर लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवले नसून माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांसोबत असतात. कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे माझे सगळ्यांची राजकीय आणि वैचारीक मतभेद आहेत. माझे कुणाशीही मनभेद नाहीत. पक्षामध्ये फूट पडलेली नाहीच. शिवाय पवार कुटुंबात तर अजिबात फूट पडली नाही”, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra politics । राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरूच! आजी, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते करणार प्रवेश

“आमच्या कुटुंबात जे काही होतं त्याला प्रायव्हसीचा अधिकार असून मला, शरद पवार, रोहित पवारांना तो अधिकार नाही, पण आमच्या उर्वरित कुटुंबियांना प्रायव्हसीचा अधिकार असल्याने आमच्या कुटुंबात, कौटुंबिक वेळात ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच सांगता येणार नाहीत. आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता हे थोडी मला सांगणार आहात”, असेदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

GN Saibaba Acquitted । सर्वात मोठी बातमी! न्यायालयाने केली नक्षलवादी संबंध प्रकरणी जीएन साईबाबासह ५ जणांची निर्दोष मुक्तता

Spread the love