Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाने घेतलेले 10 महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने मंजूर

Maratha Reservation

Maratha Reservation । बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation Strike) चांगलाच पेटून उठला आहे. याच संदर्भात मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागील आक्रमक होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी कडवी टीका देखील केली. अशातच बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मराठा समाज बांधवांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत मराठा समाजाने काही ठराव मंजूर केले आहेत. (Latest marathi news)

Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी जाहीर केली बारामतीतून उमेदवारी? व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरून रंगलीय चर्चा

मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला (Reservation Strike) मान्य नाही. यापुढे मराठा समाजातील कोणताही व्यक्ती राजकीय सभेला जाणार नाही किंवा राजकीय पुढार्‍याच्या स्टेजवर दिसणार नाही. आरक्षणासाठी जे संविधानिक पद्धतीने आंदोलन सरकारने चिरडण्याचा प्रयत्न केला तर समाज जेलभरो आंदोलन करेल. जनतेला तसीच व्यापाऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल, अशा पद्धतीचे आंदोलन मराठा समाज बांधव करणार नाही असे ठराव या बैठकीत मंजूर केले आहेत.

Shiv Sena MLA Disqualifications । ठाकरे गटाला न्यायालयाचा मोठा दिलासा! ‘त्या’ याचिकेवर लवकरच होणार सुनावणी

तसेच जरांगे पाटील यांच्या संदर्भात एसआयटी चौकशी समिती स्थापन केल्याने समाजाकडून निषेध नाेंदविला आहे. कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरु करावी. कोणत्याही तरुणावर किंवा मराठा समाजातील व्यक्तीवर दबाव टाकून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असाही ठराव मंजूर केला आहे.

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल, लवकरच होणार सुनावणी

Spread the love