Jio | जिओ ही स्वस्तात मस्त डाटा सेवा पुरवणारी आघाडीची नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाते. अगदी कमी काळातच जिओने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. जिओच्या वाढत्या युझर्सच्या संख्येमुळे कितीतरी मोठ्या-मोठ्या नेटवर्क कंपन्यांना आपले बस्तान गुंडाळावे लागले आहे. जिओ चे डाटा प्लॅन्स (Jio data palns) लोकांना आकर्षित करणारे व परवडणारे आहेत. दरम्यान आता जिओकडून ग्राहकांसाठी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यात आला आहे.
जिओ च्या या स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे लोकांना मोठा फायदा होणार आहे. कमी दारात रिचार्ज प्लॅन उपलब्ध असल्याने पैशांची देखील बचत होत आहे. कंपनीकडून आता जिओ ग्राहकांसाठी 2,545 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे.
या रिचार्ज प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची मुदत देण्यात येत आहे. त्याचबरोबार दररोज १.५ जीबी इंटरनेट डेटा देण्यात येत आहे. यामध्ये एकूण 504 GB डेटा देण्यात येतोय त्याचबरोबर या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा देण्यात येत आहे. तसेच 100 एसएमएस चा फायदा देखील दिला जात आहे.