पुणे | मागच्या दोन तीन दिवसापूर्वी एमपीएससी (MPSC) टॉपर दर्शना पवार हीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला होता. यानंतर तिचा खून झाला असल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले. यानंतर या हत्या प्रकरणी तिचा मित्र राहुल हांडोरेला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केलं आहे. दर्शनाची हत्या झाल्याच्या दिवसापासून राहुल गायब होता. अखेर आज त्याला पोलिसांनी पकडले आहे.
या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला अटक होताच या प्रकरणाबाबत पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यामध्ये राहुल हंडोरेने दर्शना पवारची हत्या का केली याचं कारणही सांगितलं आहे.
“अजित पवार यांना दाढी नसल्याने तो फिल येत नसेल”; शिंदे गटाची टीका
याबाबत बोलताना पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, “ जास्त सखोल तपास करण्यासाठी आम्हाला वेळ मिळालेला नाही. मात्र, प्राथमिक तपासात असं दिसत आहे की, दर्शनाने आरोपी राहुलला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती अंकित गोयल यांनी दिली आहे.
हे ही पाहा –