Mumbai | सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल असतात. यापैकी काही व्हिडीओ आपल्याला एकदम थक्क करणारे असतात. दरम्यान, सध्या देखील असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमचेही डोके चक्रावेल. (Latest News)
मुंबईतुन (Mumbai) हा व्हिडीओ व्हायरल झाला असून एका दुचाकीवर तब्बल ८ लोकं बसून प्रवास करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या ८ लोकांमध्ये सात जण ही शाळेतील लहान मूल आहेत तर एकजण दुचाकीचालक व्यक्ती आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Video Viral On Social Media)
जिओचे हे ‘स्वस्त आणि मस्त’ रिचार्ज प्लॅन तुम्हाला माहीतच असायला हवेत; एकदा वाचाच
या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. या दुचाकी चालकावर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. aamchi_mumbai या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.