Dhanajay Munde । कांदा प्रश्नावरून तोडगा निघणार? धनंजय मुंडे घेणार पियुष गोयल यांची भेट

Will there be a solution to the onion problem? Dhananjay Munde will meet Piyush Goyal

Dhanajay Munde । नाशिक : केंद्र सरकारने (Central Govt) कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदरच राज्यात कांद्याचे दर (Onion Price) कोसळले आहेत. त्यात सरकारच्या या निर्णयामुळे कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. (Latets Marathi News)

Sharad Pawar । शरद पवारांची आंबेगावमध्ये धडाडणार तोफ, ‘त्या’ वक्तव्याचा घेणार समाचार?

कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे हे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेणार आहेत. अगोदरच अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) वादग्रस्त कारकिर्दीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची आता ही एकप्रकारे परीक्षा असल्याचे बोलले जात आहे. या परीक्षेत मुंडे पास होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar । महायुतीत पुन्हा धुसफूस, शिंदे गटाचे आमदार भाजपकडे करणार मोठी मागणी

कांदा प्रश्नावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. विरोधात असताना धनंजय मुंडे यांनी अनेकवेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला चांगलेच घेरले होते. आता कृषिमंत्रिपदी मुंडे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही तर कांदा प्रश्न पुन्हा पेटू शकतो.

Success Story । इंजिनिअरिंगची नोकरी न करता तिने केला गांडूळ खताचा व्यवसाय, आज आहे करोडोंची उलाढाल

Spread the love