Kisan Drone Subsidy । ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून मिळतेय 5 लाखांची मदत, असा करा अर्ज

5 lakhs help from the government for the purchase of drones, apply for this

Kisan Drone Subsidy । केंद्र सरकारकडून (Central Govt) शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्याचे काम सुरू आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. केंद्र सरकारकडृून ड्रोनच्या (Drone) माध्यमातून कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवला जात आहे. औषध फवारणीसाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर केला जात आहे. वेळेशिवाय यात पैशांची बचत होत आहे. ड्रोन खरेदीसाठी (Drone Subsidy) आता सरकार मदत करत आहे. (Latest Marathi News)

Dhanajay Munde । कांदा प्रश्नावरून तोडगा निघणार? धनंजय मुंडे घेणार पियुष गोयल यांची भेट

ड्रोन खरेदी करण्यासाठी आता अनुसूचित जाती, जमाती, महिला अल्प व अल्पभूधारक शेतकरी आणि ईशान्येकडील राज्यांतील शेतकऱ्यांना खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा कमीत कमी 4 लाख रुपयांची मदत मिळत आहे. तुम्हीही यासाठी अर्ज करू शकता. (Drone Subsidy Application)

Sharad Pawar । शरद पवारांची आंबेगावमध्ये धडाडणार तोफ, ‘त्या’ वक्तव्याचा घेणार समाचार?

असा करा अर्ज

  • तुम्हाला सर्वात अगोदर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://agricoop.nic.in/ वर जावे लागेल.
  • agricoop.nic.in या वेबसाईटचे होम पेज उघडताच किसान ड्रोन योजना या पर्यायावर क्लिक करा.
  • या लिंकवरून अर्ज डाउनलोड करून या अर्जाची प्रिंट काढा.
  • अर्जातील अटी आणि नियम नीट समजून घेऊन, फॉर्म योग्यरित्या भरा. त्यानंतर कृषी विभाग किंवा संबंधित कार्यालयात जमा करा.

Ajit Pawar । महायुतीत पुन्हा धुसफूस, शिंदे गटाचे आमदार भाजपकडे करणार मोठी मागणी

जाणून घ्या फायदे

ड्रॉनच्या मदतीने तुम्हाला पिकांची पाहणी करता येईल आणि पिकांवरील रोगांची तपासणी करता येईल. पिकांवर फवारणी करण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो. तसेच यामुळे पैशांची बचत होते. ड्रॉनला लावलेल्या कॅमेऱ्यामुळे पिकांवरील किड रोगांचे माहिती ठेवता येते.

Success Story । इंजिनिअरिंगची नोकरी न करता तिने केला गांडूळ खताचा व्यवसाय, आज आहे करोडोंची उलाढाल

Spread the love