Success Story । इंजिनिअरिंगची नोकरी न करता तिने केला गांडूळ खताचा व्यवसाय, आज आहे करोडोंची उलाढाल

Without doing an engineering job, she started a vermicomposting business, today it has a turnover of crores

Success Story । देशात बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण वाढले आहे. अशातच अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे नोकरदारवर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. नोकरी नसल्याने अनेकजण व्यवसायाकडे (Business) वळू लागले आहेत. यामध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. जास्त मागणी असणारा आणि योग्य त्या प्रकारे नियोजन केले तर व्यवसायातून करोडो रुपयांची कमाई करता येते. (Latest Marathi News)

पाणी प्रश्न शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा! तरीही नातेपुते पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष

2016 मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या सना खान (Sana Khan) या महिलेने 2014 पासूनच व्यवसायाला सुरुवात केली. या व्यवसायात त्यांचे पती आणि भावाने देखील खूप केली. 2014 मध्येच त्यांनी गांडूळ खत प्रकल्पाविषयी (Vermicomposting project) माहिती घेत छोट्या पॅकिंगमध्ये गांडूळ खताच्या विक्रीला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी फक्त एक टन उत्पादन घेतले. त्यानंतर त्यात 10 टन, 50 टन अशी वाढ करत सरकारी स्तरावर गांडूळ खताचा पुरवठा सुरू केला. (Vermicomposting business)

Rakhi Sawant । “तिने माझा न्यूड व्हिडीओ तयार केला, ड्रग्ज दिले अन…” आदिल दुर्रानीने केला धक्कादायक खुलासा

असे आहे नियोजन

शेतीविषक कोणतीही माहिती नसताना मेरठ पासून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठिकाणी त्यांनी दीड एकर जमिनीवर हा प्रकल्प स्वयंचलित रीतीने उभारला आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात त्यांनी मजुरांची संख्या कमी ठेवली आहे. 400 टन गांडूळ खताची प्रक्रिया एका मशीनच्या माध्यमातून करण्यात येते. हे मशीन ग्राइंडर टाईप मध्ये आहे. यामध्ये गांडूळ खत टाकताच ते व्यवस्थित क्रश केले जाते या प्रक्रियेनंतर गाळप करून गांडूळ खत आवश्यक ते घटक मिसळून पॅकिंगसाठी तयार होते.

Weather Update । पावसाची पुन्हा हुलकावणी, ‘या’ दिवशी होणार दमदार एन्ट्री

कमाई

शहरी भागातील नर्सरी व्यावसायिक, शेतकरी, खतांची दुकाने आणि सरकारी टेंडर इत्यादी माध्यमातून सना खान गांडूळ खताची विक्री करतात. अशा माध्यमातून त्यांचा वार्षिक टर्नवर पाहिला तर तो दहा कोटींच्या पुढे आहे.

गिरणी कामगारांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा

खर्च

खर्चाचा विचार केला तर या गांडूळ खत प्रकल्पाची एका महिन्याचा मजुरावरील खर्च साडेतीन लाख रुपयाच्या जवळ आहे. शेणाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना एक ते दीड लाख रुपयांचा खर्च होतो. पॅकिंग करणारा कॉन्ट्रॅक्टरवर तीन लाख रुपये आणि विज बिलासह इतर खर्च पकडून महिन्याला सहा ते सात लाख रुपये खर्च येतो.

Pankaj Tripathi | ब्रेकिंग! पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन

Spread the love