Ajit Pawar | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांची हालचाल सुरु झाली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. यावेळच्या सर्वच आगामी निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती बीआरएसनं महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. अनेक दिग्गज नेते बीआरएस पक्षात प्रवेश करू लागले आहेत. तसेच अनेक संपर्कात असल्याच्या देखील चर्चा रंगल्या आहेत.
मोठी दुर्घटना! बोलेरोचा टायर फुटला गाडी अनियंत्रित झाली अन् भीषण अपघात झाला; ४ जण जागीच ठार
बीआरएस पक्षाबाबत अजित पवार (Ajit PAwar) यांनी एक मोठं वक्तव्य केलं होत. अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचताना बीआरएसला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे. यावरूनच विरोधक बीआरएसबाबत सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.
दिराचा वहिनीवर डोळा, कपडे बदलताना व्हिडिओ शूट केला अन् केलं धक्कादायक कृत्य; वाचून हादराल
महाराष्ट्रात आगामी निवडणुका डोळ्यासमोर के. चंद्रशेखर राव यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सभा देखील झाल्या आहेत. एवढंच नाहीतर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये बीआरएसच्या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्ता मेळावाही घेतला आहे.
आनंदाची बातमी! मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात पडला मुसळधार पाऊस
त्यानंतर आता 27 जून रोजी पंढरपूरमध्ये के. चंद्रशेखर राव हे आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन येणार आहेत. या ठिकाणी येऊन ते विठ्ठलाचं दर्शन देणार आहेत. त्याचबरोबर नंतर तुळजाभवानीचंही दर्शन घेणार आहेत. त्यामुळे आता पुढील काळामध्ये के. चद्रशेखर राव यांना महाराष्ट्र स्विकारणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मॅनेरजने ८० लाख रुपयांची फसवणूक केल्यानंतर रश्मिका मंदानाने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…