सध्या एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागच्या बऱ्याच दिवसापासून लोक पावसाची वाट पाहत आहे. त्यामुळे आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज सकाळपासून मुंबई, ठाणे, चंद्रपूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवलीत पाऊस झाला. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. (Rain Update 2023)
दिराचा वहिनीवर डोळा, कपडे बदलताना व्हिडिओ शूट केला अन् केलं धक्कादायक कृत्य; वाचून हादराल
माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात आज सकाळी पाऊस झाला. त्याचबरोबर ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथमध्ये देखील पाऊस पडला आहे. ठाण्यात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. त्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे.
मोठी दुर्घटना! बोलेरोचा टायर फुटला गाडी अनियंत्रित झाली अन् भीषण अपघात झाला; ४ जण जागीच ठार
यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील मुसळधार पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 25 जूननंतर सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
मॅनेरजने ८० लाख रुपयांची फसवणूक केल्यानंतर रश्मिका मंदानाने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…