Manoj Jarange Patil । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील करणार राजकारणात एन्ट्री?

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडतील. सर्व पक्ष निवडणुकीची आतापासूनच जोरात तयारी करत आहेत. या निवडणुकीत जनता कोणत्या पक्षाला निवडून देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच आता मराठा आंदोलनकर्ते मनोज पाटील राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Latest marathi news)

सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी लावून धरली आहे. मनोज जरांगे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आवाहन केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांना चांगला लढा देता येईल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे.

“गरीब मराठ्यांचा आवाज, जो आज जरांगे पाटील रस्त्यावर उभा करत आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये गेला पाहिजे. तिथे हा प्रतिनिधी गेला पाहिजे. त्यांचं आंदोलन सुरु असताना ते या दृष्टीने सुद्धा विचार करतील. त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. यावर आता जरांगे पाटील काय निर्णय घेतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Spread the love